india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा‎ सन्मान;‎ सोलापूर विकासाच्या नव्या‎ दिशेची‎ सुरुवात

 

 

सोलापूर‎

 

 

 

विकासाच्या नव्या‎ दिशेची सुरूवात; ‘ईच्छा‎ भगवंताची’ परिवाराकडून‎ अण्णा बनसोडे यांचा सन्मान नागपूर‎ हिवाळी‎ अधिवेशनाच्या‎ पार्श्वभूमीवर सोलापुरातील‎ पाणीपुरवठा, रोजगार, औद्योगिक वाढ व पायाभूत‎ सुविधा यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर‎ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन‎ विधानसभेचे‎ उपाध्यक्ष‎ व‎ सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क‎ मंत्री अण्णा‎ बनसोडे‎ यांनी‎ केले.‎ या‎ बैठकीस‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पक्षाचे‎ संतोष भाऊ पवार,‎ जुबेर बागवान, प्रदेश‎ उपाध्यक्ष किसन‎ जाधव,‎ ज्येष्ठ नेते‎ तौफिक शेख,‎ माजी नगरसेवक‎ आनंद चंदनशिवे, गणेश‎ पुजारी,‎ आनंद मुस्तारे,‎ प्रमोद‎ भोसले,‎ प्रदेश‎ सचिव इरफान‎ शेख,‎ सलीम पामा,‎ तुषार जक्का,‎ अनिल‎ बनसोडे,‎ शबाज किंग,रुपेश भोसले,वैभव गंगणे,हुलगप्पा‎ शासम,आनंद गाडेकर‎ यांच्यासह मनपा व जिल्हा‎ प्रशासन‎ तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापुरातील पत्रकार‎ बांधव‎ उपस्थित‎ होते.

 

 

‎ शहराच्या‎ समस्यांवर‎ सखोल चर्चा होऊन‎ संबंधित‎ अधिकाऱ्यांना त्वरित‎ उपाययोजनांचे‎ निर्देश अण्णा बनसोडे यांनी‎ दिले.‎ सोलापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या‎ समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण‎ विकासाची भूमिकाही स्पष्ट‎ केली. या पार्श्वभूमीवर किसन‎ जाधव यांनी‎ ‘ईच्छा भगवंताची’ परिवाराच्या वतीने‎ अण्णा बनसोडे यांचा‎ विशेष सन्मान केला. तथागत‎ गौतम बुद्ध, डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर, उपमुख्यमंत्री‎ अजित पवार, खासदार सुनील‎ तटकरे‎ आणि‎ अण्णा बनसोडे‎ यांची छायाचित्र असलेले एकत्र प्रतिमा असलेली फ्रेम‎ देऊन त्यांना‎ गौरवण्यात आले.‎

 

 

 

किसन‎ जाधव‎ यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडच्या‎ धर्तीवर सोलापूरचा‎ विकास करण्याचा अण्णा बनसोडे यांचा‎ मानस शहरासाठी‎ आश्वासक असून त्यांच्या‎ विकासदृष्टिकोनाला पूर्ण पाठिंबा‎ देऊ.‎ सोलापूरच्या‎ सर्वांगीण‎ प्रगतीसाठी‎ ही बैठक आणि‎ दिलेला‎ सन्मान‎ महत्त्वाचा‎ टप्पा‎ ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button