गुन्हे शाखेने, आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक करून, घरफोडीचे ०२ गुन्हे उघडकीस आणुन, १,९३,३५०/- रू. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त….

सोलापूर शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील सपोनि/संदीप पाटील व त्यांचे तपास पथक प्रयत्नशील होते. या पथकाने, दिवसा घरफोडी चोरी करणारा पर-जिल्ह्यातील, रेकॉर्ड वरील आरोपी नामे सॅमसन रूबेन डॅनियल, वय-२६ वर्षे, रा. डॅनिअल हाऊस, रूम नं-५, बेतुरकरपाडा क्वालिटी कंपनी जवळ, कल्याण वेस्ट, कल्याण, ठाणे यास दि.१९/१२/२०२४ रोजी अटक केली.या मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी कडून १ लाख ९३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. व आरोपीवर सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ४५४,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकुण ४८.१३ ग्रॅम सोने व ३४ ग्रॅम चांदी आरोपी कडून हस्तगत करण्यात आली आहे.
आरोपी हा, दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून, तो ठाणे येथे राहणारा आहे. त्याचेविरूध्द, सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रा राज्यातील ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगांव, तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यात देखील दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./संदिप पाटील, व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, निलोफर तांबोळी, गणेश शिंदे, चालक सतिश काटे, फरदिन शेख, सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड, यांनी केली आहे.