सलापूर तालुका पोलीस स्टेशन आयोजित “सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार सोहळा 2025” संपन्न*..

सोलापूर
तालुका पोलीस स्टेशन हद्दीत यावर्षी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश उत्सव साजरा करीत असताना ज्या गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्ती, ध्वनीप्रदूषण न करणे, DJ Dolby चा वापर न करणे, सामाजिक उपक्रम राबवणे, मिरवणूक न काढणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन केले त्यांचा *सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार* देऊन सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. विजेत्या गणेश मंडळांना श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
गणेशोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण करणाऱ्या 3 मंडळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. त्या खालोखाल 5 मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. मिरवणूक न काढता जागीच विसर्जन करणाऱ्या 17 मंडळांचा देखील सत्कार करण्यात आला.

सदर पुरस्कार सोहळ्याचे संपूर्ण नियोजन व कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी केले. आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके यांनी केले.
विजेत्या मंडळांची निवड पर्यवेक्षक राज साळुंखे व अतिश गवळी यांनी केली.
सदर कार्यक्रमाला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळचे पदाधिकारी, सर्व पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सदर पुरस्कार सोहळा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, नागाबाई गंपले पोलीस अंमलदार सचिन मागाडे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडला.



