सिद्धरामेश्वरांच्या दीपमाळेसाठी भक्त झाले आक्रमक हातोड्याने तोडले कुलूप, काही काळ तणावाचे वातावरण, वाहतूकही खोळंबोली…

सोलापूर
शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचा मंदिर आणि तलाव परिसर स्वच्छ असावा या गोष्टीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध समाज घटक आणि संघटना आग्रही आहेत. त्यातच सोमवारी सायंकाळी एका संघटनेने बंदिस्त करण्यात आलेली दीपमाळ मोकळी करण्यासाठी आंदोलन केले.

सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समिती या संघटनेतर्फे पंचकट्टा परिसरात असणाऱ्या दीपमाळ स्थानावर आंदोलन करण्यात आले. प्रारंभी ‘शिवयोगी श्रीसिध्दरामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत या दीपमाळेला बंदिस्त करण्यात आलेल्या तोडण्यात आलेले कुलूप तोडण्यात आले. आतील परिसर स्वच्छ करावा असा या संघटनेच्या आंदोलनाचा विषय होता. परंतु संबंधित भाडेकरू व परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने काही वेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

त्यामुळे पंचकट्टा चौकात काहीवेळ वाहतूक खोळंबली. भक्त समितीचे अध्यक्ष विजय चोळ्ळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा परिसर स्वच्छ करावा असा मानस करुन हे आंदोलन केले होते. परंतु अनेकांनी हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन तिथेच थांबले. परंतु आता शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आणि तलाव परिसर याचे पावित्र्य अबाधित राहावे आणि प्रतिकात्मक कुंभस्थान असणाऱ्या या परिसराची देखभाल दुरुस्ती नित्यनेमाने व्हावी यासाठी आता सोलापूरकर आक्रमक झाल्याचे यातून दिसून येते.

चौकट
मंदिर समितीची भूमिका आवश्यक
मूळात ही जागा भाड्याने देताच कशी येते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तसेच एक दिपमाळ पुजली जाते, तर दुसरी बंदीस्त का असेही अनेकांनी विचारले. श्री सिध्देश्वर देवस्थान मंदिर समितीने सर्व भक्तांच्या भावना पाहता या दुसऱ्या दिपमाळेचा परिसर खुला करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच या जागेवर भाडे पट्ट्यावर असणारे पाटील यांना तुमची भूमिका सांगा असे म्हटल्यावर त्यांनी या संदर्भात मंदिर समितीचे धर्मराज काडादी आपली भूमिका सांगतील असे सांगितले…



