
सोलापूर
सध्या गणेशोत्सव सोलापूर शहर – जिल्ह्यात आनंदात साजरा केला जातोय.या गणेशोत्सवाच्या पार्श्भूमीवर विविध मंडळ सामाजिक उपक्रमावर विशेषत: भर देतायत त्यापैकी एक सोलापुरातील नावाजलेले मंडळ पाणीवेस तालीम. या मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रमावर भर दिला जातो.याही वर्षी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त श्री चरणी तब्बल पाचशे किलोंचे लाडू अर्पण करून हे लाडू गणेशभक्तांना प्रसाद सवरुपत वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रमासाठी मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत{काका } वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत {मुन्ना} वानकर यांच्या नेतृत्वाखाली सुभाष { गुरुजी } पवार, उमेश कुरुलकर ,व्यंकटेश झुंजे, शुभम तिवारी, अभिषेक कुरुलकर, अनीश पवार, श्रेयस कुरुलकर ,समर्थ जाधव ,निरंजन पवार, निखिल झुंजे ,यांच्यासह पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले….