maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर महापालिका निवडणूक: ‘बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करणार’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हत्तुरे वस्तीत प्रतिपादन….

सोलापूर

आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राज्याचे कृषिमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहराचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हत्तुरे वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब हत्तुरे व श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

 

 

यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या ध्येयधोरणांचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

 

 

 

भरणे यांनी पुढे नमूद केले की, सध्याच्या घडीला शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून सर्व स्तरांतून जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी निवडणुकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

 

या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी हत्तुरे परिवारासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे हत्तुरे वस्ती परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button