धन्यवाद ” देवाभाऊ” प्रधानेंच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..
"आपला नगरसेवक भावी नगरसेवक"प्रधानेंची सोशल मीडियावर क्रेझ..

सोलापूर/प्रतिनिधी
बिज्जू प्रधाने यांची राजकीय सुरुवातच भारतीय जनता पक्षातून झाली . आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात प्रधाने भाजपात चांगलेच सक्रीय होते.आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रधाने यांची विशेष ओळख होती.

देशमुखांचे समर्थक असताना भाजपातील बड्या नेत्यांसोबत प्रधानेंचा संपर्क चांगलाच वाढला होता.२०१२ मध्ये प्रभाग १३ तर २०१७ मध्ये प्रभाग ६ मधून बिज्जू प्रधाने यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविली होती.मात्र दोन्ही वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला.पक्षांतर्गत कुरघोडी मुळे नाराज झालेल्या प्रधानेंनी भारतीय जनता पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी{ शरद पवार गटात }प्रवेश केला होता. मात्र तिथेही त्यांच्या पदरात निराशाच पडली.

त्यामुळे त्यांनी राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत व त्यांचे विचार आत्मसात करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी { अजित दादा गटात} प्रवेश केला होता.
पक्ष प्रवेशा नंतरही जे भारतीय जनता पक्षात झालं तीच स्थिती प्रधानेंची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी { अजित दादा गटात} झाली.

२०२४ च्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी पक्ष{ अजित दादा गटात } असून देखील पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन तसेच महायुती सरकारने शहर उत्तर मतदार संघासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र प्रधाने यांनी महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे तत्कालीन उमेदवार दिवंगत महेश कोठे यांच्या विजयासाठी मतदारांसमोर लोटांगण घातले होते. तशी बिज्जू प्रधाने यांची आत्ता पर्यंतची कारकीर्द अपयशीच ठरली.

यानंतर महायुती सरकार राज्यात विकासाभिमुख काम करत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यात विशेष प्रभाव आहे.केंद्रीय नेतृत्व ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरला विमानसेवा सुरू झाली.सोलापूर – गोवा नंतर आता सोलापूर – मुंबई – बंगळुरू विमानसेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विमान नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते बुधवारी सोलापूर विमान तळावर जल्लोषात उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास बिज्जू प्रधाने व त्यांचे समर्थक आवर्जून उपस्थित होते.

आजचा फोटो
सोलापूर – मुंबई विमानसेवा सुरू केल्याबद्दल धन्यवाद “देवाभाऊ” अशी पोस्ट प्रधाने यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत केली.त्यामध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व व्यक्तिशः प्रधाने यांनी त्यांचा फोटो असा एकत्रित आभारपर फोटो प्रसारीत केला होता.सोबतच माजी नगरसेविका तोडकरी, डांगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर” देवाभाऊंचे” स्वागतपर फोटो प्रसारीत केले होते.यावरुन एकंदरीत बिज्जू प्रधाने व त्यांचे समर्थक आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे .शहरात आमदार देवेंद्र कोठे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विशेष प्रभुत्व असल्याचे भाजप नेते – पदाधिकारी सांगतात.विविध पक्षातील अनेक बडे नेते कोठे व कल्याणशेट्टी यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे .दिवंगत महेश कोठे यांचा प्रधाने यांनी केलेला प्रचार सद्यस्थितीत कितपत फायदेशीर ठरणार ? आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात प्रधाने यांचा पक्ष प्रवेशानंतर प्रधानेंची पुढची मोर्चे बांधणी नेमकी कशी असेल ? शहर उत्तरच्या तापलेल्या राजकारणात प्रधानेंचा सक्रिय पक्ष प्रवेश धोक्याची घंटा ठरू शकेल का ? प्रधाने यांच्या भाजपातील सक्रिय सहभागानंतर पक्षश्रेष्ठी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर करतील का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सद्यस्थितीत बिज्जू प्रधाने यांच्या भाजपातील सक्रिय सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर “आपला नगरसेवक माझा नगरसेवक” या गाण्याचा वापर करत बिज्जू प्रधाने यांचे फोटो प्रसारीत केले आहे.येणाऱ्या काळात देशमुख विरुद्ध प्रधाने हे स्पष्ट चित्र पहायला मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीवेळी विरोधात केलेल्या प्रधानेंच्या प्रचारावर स्थानिक स्वराज संस्थेच्या उमेदवारीवरून प्रकर्षाने आमदार विजयकुमार देशमुख पक्ष श्रेष्ठींकडे तीव्र विरोध करणार का? प्रधाने यांच्या उमेदवारीचे नेमके काय होणार ? हे येणारा काळच सांगू शकेल …



