maharashtrapoliticalsocialsolapur

“गुरूपुषामृत”दिनाच्या मुहूर्तावर विद्या लोळगे यांनी पक्ष श्रेष्ठींकडून स्वीकारला मुंबईत माजी महापौर महेश कोठे यांचा AB फॉर्म…

शहर उत्तर मध्ये पाहायला मिळणार "काटे की टक्कर" सामना...

सोलापूर 

शहर उत्तर मतदार संघाकडे सोलापूर जिल्हा सह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शहर उत्तर मधून माजी पालकमंत्र्यासह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी {शरद पवार} गटाकडून माजी महापौर महेश कोठे यांनी तुतारी हाती घेत शहर उत्तर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तशी जोरदार तयार पूर्वी पासूनच कोठे समर्थकांनी केली आहे.महेश कोठे यांनी प्रत्यक्ष भेटी – गाठी वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. “गुरूपुषामृत” दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोळगे यांनी आज मुंबईत पक्षश्रेष्ठीकडून महेश कोठे यांचा AB फॉर्म स्वीकारला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व जयंत पाटील हे शहर उत्तर वर गेल्या कित्येक दिवसांपासून विशेष लक्ष ठेवून होते.आणि माजी पालकमंत्र्यां विरोधात महेश कोठे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याची यापूर्वी जाहीर केलं होत.
दरम्यान मुंबईत AB फॉर्म स्विकारल्या नंतर पुढील हालचालींना वेग आला आहे.२८ नोव्हेंबर रोजी महेश कोठे हे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते ,समर्थक,मित्र पक्षाला सोबत घेत शहर उत्तर साठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शहर मध्य ची जागा भाजपा ला देण्यात आल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे शहर उत्तर लढवण्यावर ठाम आहेत.शिवसेनेचेच उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड हे देखील शहर उत्तर मधूनच इच्छुक असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे या मतदार संघात चुरशीचा सामना होणार असल्याने बहुरंगी लढत विषेत: पाहायला मिळणार आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button