मनीष काळजे यांचे वक्तव्य म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग -युवासेना कार्यकारणी सदस्य सुजीत खुर्द…
मंत्री सावंत यांना दिलेल्या इशारानंतर सुजित खुर्द यांची मनीष काळजे यांच्यावर टीका...

सोलापूर
शिवसेना उपनेते तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या घरामध्ये नुकतीचा अप्रिय घटना घडली. तानाजी सावंत यांचे मोठे बंधू सुभाष सावंत यांचे दुःखद निधन झाले. ही घटना घडली असताना अनिल सावंत व शरद पवार यांची भेट ही सांत्वनपर भेट होती. तानाजीराव सावंत साहेब यांनी राष्ट्रवादी चा बालेकिल्ला भेदून भूम परांडा जिंकला आहे ते राष्ट्रवादी चे पहिल्या पासून विरोधक आहेत अख्खा धाराशिव जिल्हा सावंत साहेबांनी भगवा केला आहे. त्यांनी तानाजीराव सावंत साहेबांना शिकवू नये.
खंडणी गोळा करताना उघडे पडलेले कार्यकर्ते स्वतः पक्षाशी प्रामाणिक असल्याचा आव आणत पक्षाची भूमिका काय आहे याची वाट न पाहता स्वतः पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता असल्याचे दिवा स्वप्न पाहत शिवसेना उपनेते तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यावर टीका करायचे काम करत आहे. पक्षाच्या पदाचा वापर केवळ खंडण्या गोळा करणे, महिलांना लुबाडणे, नातेवाईकांची फसवणूक करणे असा धंदा असलेल्या उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उपक्तीप्रमाणे क्षणाची वाट न पाहता शिवसेना उपनेते तथा आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेबांवर टीका करणाऱ्या जिल्हाप्रमुखावर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे युवा सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.