श्री स्वामी समर्थां बद्दल अपशब्द बोलणाऱ्या समाजकंटक ज्ञानेश महाराव याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा:- रमेश सिद्धारामप्पा पाटील{ भाजपा नेते }…

सोलापूर
अनेकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी सोलापूर शहर जिल्ह्याचा भारतातून अनेक स्वामी भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला येत असतात. स्वामींचे पुण्यतिथी असो अथवा जयंती सर्वच उत्सव गुण्या गोविंदात आनंदात साजरे होतात. अक्कलकोटला स्वामींचे दर्शनासाठी नेहमी अलोट गर्दी पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनेक भक्त भाविकांच्या पाठीशी असल्याने समाजात शांतता सुव्यवस्था सर्वच सण उत्सव आनंदात साजरे केले जातात. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव प्रत्येकास प्रामुख्याने अनुभवास मिळतो. याच स्वामी समर्थां बद्दल समाजात शांतता सुव्यवस्था याला बाधा आणत समाजकंटक ज्ञानेश महाराज याने अवमानकारक वक्तव्य केल आहे. विशेष म्हणजे खा. शरद पवार व कोल्हापूरचे खा.शाहू महाराज यांच्यासमोर एका कार्यक्रमात असं वक्तव्य केल्याने समाजातून संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या समाजकंटक ज्ञानेश महाराव भक्तगणांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
या ज्ञानेश महाराव याच्या आव्हान अवमान कारक वक्तव्यानंतर भक्तगणांशी मने दुखावले गेले असून ज्ञानेश महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी रमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या घटनेचा सर्व स्तरावरून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय. या निवेदना नंतर पोलीस अधीक्षकांनी ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत
हे निवेदन देतेवेळी श्रीशैल हुळळे उमाकांत शटगार बसवराज आहेरवाडी सगपा बबलाद योगेंद्र मोगे महादेव बिराजदार यांची उपस्थिती होती...