india- worldmaharashtrapoliticalsocialsolapurSports

चीन तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत साईराज तू नक्कीच विजयी होशील..! जिल्हाध्यक्ष संतोष पवार…

सोलापूर

चीन मधील तायपे येथे होणाऱ्या
आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या देशातून साईराज हणमे यांची निवड राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी फेटा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून शुभेच्छा दिल्या …

सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियन्सशीपसाठी झालेल्या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईराज हणमे याने देशात प्रथम क्रमांक मिळवून भारतीय संघात प्रथम क्रमांक मिळवला . या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यालयामध्ये साईराज हणमे यास पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

सोलापूर जिल्हा मधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे. याचा सर्व सोलापूरकरांना अभिमान आहे. भविष्यात त्याने भारताची मान उंचावेल अशी कामगिरी करावी अशा शुभेच्छा संतोष पवार यांनी यावेळी साईराज याला दिल्या.

साईराज याने हे यश रिकर्व्ह या प्रकारात मिळवले , पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा या चीन मधील तायपे येथे होणार आहेत.त्याला प्रशिक्षक दिपक चिकणे याचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी लक्ष्मण जाधव, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa