maharashtrasocialsolapur

शिवजन्मोत्सव-29 श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून अभ्यासिका व वाचनालय सुरु…

महिलांच्या हस्ते नुतन इमारतीची वास्तुशांती करून प्रारंभ...

सोलापूर, दि. 28 ऑगस्ट –
तभा वृत्तसेवा
शहरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने डाळींबी आड मैदान (इंदिरा कन्या प्रशाला) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अभ्यासिक व वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून बुधवारी या नुतन इमारतीची महिलांच्या हस्ते वास्तुशांती करण्यात येऊन अभ्यासिका व वाचनालय सुरु करण्यात आले.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गेल्या चार वर्षापासून देशात कुठेही साजरा होत नसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा साजरा करण्यास सोलापुरातून महामंडळाच्यावतीने सुरुवात करण्यात आली. या महामंडळाला स्वतःच्या हक्काच्या जागेत अभ्यासिका व वाचनालय सुरु करण्यासाठी इमारत नव्हती. त्यामुळे याबाबत महामंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात येऊन डाळींबी आड मैदान येथे गेल्या एक वर्षापासून इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आलेले होते. या बांधकामासाठी आ. सुभाष देशमुख आणि शिवसेनेचे नेते मनिष काळजे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 80 लाख रुपये, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असून बुधवारी या इमारतीचा वास्तुशांतीचा सोहळा पार पडला. यावेळी पूजेसाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांनी सपत्नीक यजमानपद भूषविले. यावेळी महामंडळाच्या सर्व ट्रस्टी सदस्यांच्या पत्नींच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या मुर्तीची पुजा करून अभ्यासिका व वाचनालयाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे, खासदार प्रणिती शिंदे, आ. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, सचिव प्रितम परदेशी, अक्कलकोट येथील जन्मेजय भोसले, जयंत शेळके, दिलीप कोल्हे, शिवाजी घाडगे, पुरुषोत्तम बरडे, चंद्रकांत वानकर, राजन जाधव, नागेश ताकमोगे, महादेव गवळी, प्रभाकर रोडगे, विक्रांत वानकर, विनोद भोसले, ज्ञानेश्वर सपाटे, अनिकेत पिसे, बजरंग जाधव, प्रकाश ननवरे, सचिन स्वामी, देविदास घुले, भोजरंगे यांच्यासह शहराच्या विविध परिसरातील शिवजन्मोत्सव मंडळाच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button