entertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आत्मक्लेष आंदोलन…

संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, भ्रष्टाचार करणाऱ्यांना शासन व्हावे...

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट, मालवण येथे काही दिवसापूर्वी पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चबुतऱ्या वरून खाली पडून भंग झाल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने दास शेळके यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning

शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे चित्र हे मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. अद्याप पर्यंत अशी घटना राज्यात देशात कुठेही आतापर्यंत झालेली नाही. यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याला शासन व्हावे अशी मागणी सुनील रसाळे यांनी केली.
यावेळी शिवाजी सावंत, अमोल शिंदे, आनंद जाधव, बाळासाहेब गायकवाड, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button