देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे सोलापूरच्या विमान तळावर सोलापूर बार असोसिएशनकडून स्वागतपर सत्कार….

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई काही वेळे करिता सोलापूर विमानतळावर आले असता सोलापूर बार असोसिएशन पदाधिकारी, न्यायाधीश , यांच्यावतीने सर न्यायाधीश भूषण गवई यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष एडवोकेट रियाज शेख, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य एडवोकेट मिलिंद थोबडे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा साहेब , सत्र न्यायाधीश योगेश राणे ,
सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन ओम प्रकाश पाटील, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयातील प्रबंधक मुकुंद ढोबळे, राजशिष्टाचार विभागाचे राजे पांढरे, अजित पगड्याल , अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तसेच या धावत्या भेटीदरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

अवघ्या पाच मिनिटाच्या या भेटीदरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई सर यांनी बार च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. व केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी बारशा पदाधिकाऱ्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना सोलापूरला एकदा भेट देण्यासंदर्भात चर्चा केली . भविष्यात नक्कीच सोलापूरला भेट देऊ.. अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
देशाच्या उच्च पदावर सरन्यायाधीश म्हणून काम करणारे भूषण गवई यांची सोलापूर विमानतळावर झालेली ही भेट ऐतिहासिक भेट आहे.




