दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून खून केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सोलापूर:- येथील रहिवासी १. अमृता संदीप शिंदे वय-३५वर्षे, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी, सोलापूर. २. लक्ष्मी आकाश बलरामवाले वय-२२वर्षे, रा.झोपडपट्टी नं.१ विजापूर नाका, सोलापूर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
यात थोडक्यात हकीकत की, दि.१७/१०/२०२५ रोजी रात्री ११.०० वाजणेच्या सुमारास फिर्यादी प्रतिमा शंके या घरासमोर रस्त्यावर उभ्या असताना मोठमोठ्याने भांडण्याचा आवाज येत असल्याने फिर्यादी प्रतिमा शंके या गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ संघर्ष तरुण मंडळाच्या पुढे आरोपी १) आकाश तुळजाराम बलरामवाले २) नवल करे हे फिर्यादीचे पती यतिराज शंके यास “दारु पिण्यास पैसे का देत नाही तुला बघुन घेतो” असे म्हणून हाताने वं लाथाबुक्क्याने मारहाण करत होते. त्यावेळी आकाश बलरामवाले हा पळून जावून त्याच्या घरातील कुन्हाड घेवून आला व यतिराज शंके याचे डोक्यात पाठीमागून कुन्हाडीने वार केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मयत यतिराज शंके यांच्या पत्नीने विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.५००/२०२५ अन्वये दाखल केली होती. सदर गुन्ह्यात यापूर्वी पोलीसांनी आकाश बलरामवाले व नवल करे या आरोपींना अटक केलेली आहे.

अॅड. विश्वास शिंदे
दि.२८/१२/२०२५ रोजी सदर गुन्ह्यात अमृता संदीप शिंदे व लक्ष्मी आकाश बलरामवाले या नवीन आरोपींना अटक करुन दि.२९/१२/२०२५ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. व्ही. एम. रेडकर यांचे समोर हजर केले असता मे. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. विश्वास शिंदे अॅड. रेवण पाटील यांनी काम पाहिले.



