maharashtrapoliticalsocialsolapur

शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर जाऊन धनश्रीला दिला धीर

.

 

सोलापूर

 

सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेमध्ये धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. धनश्रीने चांगला अभ्यास केलेला परंतु तिचे वडील भिकाजी पवार यांचे सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरातील सर्व सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

 

 

अंत्यविधीसाठी नातेवाईक, शेजारी जमा होत होते. धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न वाया जाणार म्हणून शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक अस्वस्थ होते. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन नातेवाईक व धनश्रीच्या आईला, भावाला समजावून सांगून दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला सांगितले. धनश्रीला धीर दिला आणि तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसविले.पूर्ण तीन तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते, म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब यांना कॉल करून सांगितले. शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा प्रसंग पाहून केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांना तिला अर्ध्यातून सोडण्याविषयी सांगितले.

 

 

शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर येऊन धनश्रीला धीर दिला . दीड तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर अंत्यविधीला आणले. धनश्रीच्या या धैर्यामुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांचेच डोळे पाणावले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button