india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

प्रभाग ३ मध्ये दोन माजी नगरसेवकांची एकत्र उपस्थिती; योगेश गिराम यांच्या वाढदिवसानिमित्त सकारात्मक वातावरण…

सोलापूर :

 

प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभावी माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील व राजकुमार भैया पाटील यांचे ठोस वर्चस्व मानले जाते. या दोन्ही अनुभवी नेत्यांची एकाच मंचावर झालेली एकत्र उपस्थिती भाजपा सोशल मीडिया प्रमुख व प्रभाग क्रमांक ३ मधून इच्छुक नगरसेवक योगेश गिराम यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषत्वाने पाहायला मिळाली.
कार्यक्रमात दोन्ही माजी नगरसेवकांनी योगेश गिराम यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यातील राजकीय वाटचालीस सद्भावपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. या उपस्थितीमुळे प्रभागात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.

 

 

यावेळी भारतीय जनता पार्टी एससी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, आरपीआयचे नेते के. डी. मामा कांबळे, फ्रेंड्स ग्रुप, मित्रपरिवार तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांचा उर्जा भरलेला प्रतिसाद हा कार्यक्रमाचा विशेष ठळक भाग ठरला.

 

 

 

लिंगायत समाजातील उदयनमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे योगेश गिराम प्रभाग ३ मध्ये सक्रियपणे कार्यरत असून, दोन्ही माजी नगरसेवकांसह विविध सामाजिक व राजकीय गटांकडून मिळालेला हा व्यापक पाठिंबा प्रभागातील राजकीय समीकरणात सकारात्मक आणि महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक एकजूट आणि सहकार्याचे वातावरण निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर उमटत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button