maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर महापालिका आयुक्तांनी केली जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाची  पाहणी…

प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आयुक्तांनी दिल्या अधिकाऱ्यांना कडक सूचना...

 

सोलापूर

मनपा आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज दिनांक 15/11/2025 रोजी मनपाच्या जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाला भेट दिली आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला.

या वेळी आयुक्तांनी सर्व प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणेकामी सूचना दिल्या असून वेळेत निपटारा न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, नागरिकांना त्यांच्या कामांसाठी अनावश्यक विलंब न होऊ देणे आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करणे आवश्यक आहे.

आयुक्तांनी अभिलेखापाल कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेले रजिस्टर त्याची नोंदणी इत्यादीची माहिती घेतली. त्यांनी कार्यालयातील कामकाजाची व्यवस्था आणि नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला.

यावेळी उपायुक्त आशिष लोकरे व अंतर्गत लेखा परिक्षक श्री राहुल कुलकर्णी, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. आयुक्तांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांना निर्देश दिले की, नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत.

मनपा आयुक्तांच्या या पाहणी मुळे जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयातील कामकाजात सुधारणा होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना त्यांच्या कामांसाठी अनावश्यक विलंब न होता जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia