
राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली ” ऑपरेशन परिवर्तन ” या मोहीमे अंतर्गत चोरून अवैधरित्या गावंठी हातभट्टी दारू तयार करणा-यांची दिनांक 22.07.2025 रोजी मौजे मुळेगाव तांडा येथे बैठक घेतली.
पोनि/राहुल देशपांडे यांनी बैठकी करीता उपस्थित असलेल्या लोकांना चोरून अवैध गावंठी दारू काढण्या पासुन परावृत्त करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले आहे. मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पेनतुन ज्या नागरिकांची शेती आहे त्यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य, मार्गदर्शन व सेंद्रीय शेती करणे करीता संबंधीत विभागाशी समन्वय साधुन पोलीस विभागा कडुन योग्य ती मदत करण्यात येणार आहे.
आगामी काळात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीसाठी जे तरूण इच्छुक आहेत. अशा तरूणांना पोलीस भरती करीता शारिरीक चाचणी व लेखी परीक्षे करीता मोफत विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आवाहन केले आहे.
आगामी काळात जे मुले शिकले आहेत. अशा मुलांना रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यांची नावे सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे नोंदवावी या करीता आवाहन केले आहे. अवैध व्यवसाय सोडुन मुख्य प्रवाहात येणे करीता लोकांना आवाहन केले आहे.
जे लोक सांगुन ऐकणार नाहीत अशा लोकां विरूध्द वेळोवेळी छापे टाकुन गुन्हे दाखल करून त्या संबंधीत लोका विरूध्द प्रचलित कायद्या नुसार कडक कारवाई करण्यात येईल. त्याचे विरूध्द हद्दपार, एम.पी.डी.ए सारख्या कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी बैठक घेतली. सदर बैठकी करीता मुळेगाव तांडा येथील सरपंच, नागरिक व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार हे उपस्थित होते…..



