अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग सोलापूर यांच्या वतीने राज्यमंत्री योगेश कदम यांचा पोलिस आयुक्त कार्यालयात सत्कार….

सोलापूर
बुधवारी राज्यमंत्री योगेश कदम सोलापूर दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी विविध शासकीय कामांचा आढावा घेतला.पोलिस आयुक्त कार्यालयास भेट देऊन शासकीय कामांचा आढावा घेतला.यावेळी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्यावतीने राज्यमंत्री योगेश कदम यांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या भेटी दरम्यान सोलापूर जिल्ह्यासाठी वाढीव इस्थांक मिळावा व प्रलंबित कमिशन आणि चालू कमिशन वेळेत मिळावे .याबाबत निवेदन देण्यात आले.सोलापूर जिल्ह्यातील दुकानदारांना दैनंदिन वाटपात येणाऱ्या अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
राज्यात अपात्र शिधा मोहीम राबविली जात आहे. त्याबाबत दुकानदारांना फॉर्म प्रिंट बाबतीत होत असलेल्या आर्थिक भुर्दंड व अपात्र शिधा पत्रिकेबाबत होत असलेली सक्ती व महाराष्ट्रात ई – केवायसी जवळपास ७५ ते ८० % टप्यावर येऊन ठेपलेले असताना लहान व वयोवृद्ध अशा शिधा पत्रिकेतील सदस्यांचे न होणाऱ्याचे धान्य कपात होऊ नये ,त्याचप्रमाणे गोडाऊन मधून दुकानदारांना धान्य मोठ्या प्रमाणात तूट येत असल्याबाबतची तक्रार मंत्री योगेश कदम यांच्यासमोर मांडण्यात आली.

तसेच वेळे अभावी किंवा गर्दीमुळे ग्राहकाकडून न घेतलेल्या थम ट्रांजेकशन पूर्ण होण्यासाठी ग्राहकांकडून घेत असलेल्या थम ऐवजी OTP हे न घेण्याबाबतच्या सक्तीच्या सूचना संबंधित कडून होत असल्याच्या निदर्शनास आणून दिले.या सर्व तक्रारींच्या अडचणींची सविस्तर माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे वचन मंत्री योगेश कदम यांनी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागास दिले.
या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.संतोषजी सरडे साहेब,अन्नधान्य वितरण अधिकारी श्री.ओंकारजी पडोळे साहेब,जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, बापूसाहेब गंदगे पंच कमिटी सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष उमेश आसादे, जिल्हा सचिव राज कमटम, सह सचिव मुद्दसर शेख तसेच जिल्हा प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते….



